Latest News

आरोग्यरहस्य लेखमाला ७

गुरु लघु आहाराची चिंता 🤦‍♀ कोणी करु नये ते आता पाहू!
म्हणजे अमुक पदार्थ पचायला जड 🍗🍖 नि तमुक हलका 🍵 असा विचार कोणी करणे फारसे गरजेचे नाही ते पाहू!

बलिन :-
शक्ति उपचय युक्त अर्थात बलवान 💪 व्यक्ती. उदा. जे कष्ट सहज सहन करु शकतात; डबल सिट सायकल 🚴‍♀ चालवताना, मैदानी खेळ🏑🏏🏸⚽ खेळताना, डोंगर 🧗‍♂ किंवा जिने चढताना ज्यांची लगेच दमछाक होत नाही; सामान शिफ्ट करताना ज्यांचे धाबे दणाणत नाहीत; व्यायाम करताना जे दिवसेंदिवस अधिक वजने 🏋उचलू शकतात; प्रवासानंतर 🚎सुध्दा जे लगेच काम करु शकतात असे व्यक्ती.

खरभक्ष्या :-
ज्यांना वेळेला काहीही खाऊन 🍔🥗🍦 पचवायची सवय असते!

दिप्ताग्नय :-
ज्यांचा अग्नि प्रदिप्त 😋😋 असतो म्हणजे ज्यांची भट्टी 🔥 वेळीच पेटलेली असते असे व्यक्ती.

कर्मनित्या :-
जे सतत कोणत्या ना कोणत्या कार्यात व्यस्त 🤼‍♀🏂🏋असतात, आयुष्याला खडे मारत बसणे किंवा केवळ बघ्याची 👀 भूमिका घेणे ज्यांच्या धोरणात बसत नाही असे व्यक्ती. जे नित्य व्यायाम ⛹‍♀🚴‍♀🏊‍♀ करतात तेही यातच समाविष्ट होतात.

उपरोक्त मंडळी प्रायः सर्व काही पचवण्यास समर्थ असतात, पण म्हणून रोजच अतिरेक करण्याचा परवाना मिळाला असे वागू नये ही विनंती! अन्यथा अग्नि मंद होऊन अजीर्ण होणार हे ठरलेलच! कारण प्रत्येक गोष्टीला ठराविक मर्यादा असतात, हे विसरुन कसं चालेल!

डाॅ.मंगेश देसाई
आयुर्वेदाचार्य
योग व संमोहन उपचार तज्ञ, पुणे.

 

For regular updates, like and follow:

Leave a Reply

Scroll to top