आरोग्यरहस्य लेखमाला (भाग १)

वाचक हो, चला आजपासून आपण सहज सुलभ आरोग्यप्राप्तीची रहस्य जाणून घेऊयात!

मला आज पोटात कसं तरीच😒 होतय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन!
हे जडं नि हलकं अन्न काय असत?, नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय?, ते पाहूयात!

*जड अन्न म्हणजे गुरु आहार
हलके अन्न म्हणजे लघु आहार*

*गुरु लघु आहाराची चर्चा करताना द्रव्य- स्वभाव,संस्कार,मात्रा,अन्नकाल आदि बाबींचा विचार करावा लागतो.*

*स्वभाव*:-
काही पदार्थ स्वभावतःच गुरू असतात.उदाः श्रीखंड😋,मांसाहार 🍗🍖🍤इ.
तर काही स्वभावतःच लघु असतात.उदाः साळीच्या लाह्या,कुरमुरे इ.

*संस्कार*:-
दूधापासून बनवलेले खवा,रबडी,श्रीखंड आदि पदार्थ गुरु असतात तर दूधात सुंठ🥛 घातली कि ते लघु होते.
म्हणजे संस्काराने जसे आपले स्वभाव गुण बदलता येतात तसेच अन्नसंस्काराने अन्नाचे गुण🍿🥣बदलतात बरं का!

*मात्रा*:-
मात्रा म्हणजे प्रमाण.
श्रीखंड असले की पोटास तडस लागेपर्यंत न खाता थोडे घास कमी खाणे किंवा त्यावेळी भात न खाणे अशा युक्त्या आपण करतो कि नाही ? हाच मात्रा विचार!

*अन्न*:-
ताप असेल किंवा अजीर्ण झाले असेल तर आपण काय करतो बरं? भाताची किंवा मूगाची पेज🍵पितो,राजगीरा लाडू खातो हा विचार अंगवळणी पडलाय ना आपल्या!

*काल*:-
रात्री उशीरा जेवून लगेच झोपल्याने अपचन होते😦,आळस येतो😔 कालांतराने वजन वाढते हे ऐव्हाना सर्वांना माहित असेलचं!

~ *डाॅ.मंगेश देसाई*
आयुर्वेदाचार्य
पिंपळे सौदागर,पूणे.
9870754046
7378823732

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *